संमोहन उपचारांच्या कार्यशाळेबाबत माहिती

      आपण या वेबासाईटवरील आमची कामयाबी की ओर ही DVD पाहिली असेलच. त्यामुळे आमच्या संमोहन उपचारांच्या कार्यशाळेमुळे होणारे फायदे आपल्या लक्षात आलेच असतील. तसेच आपले मानसिक व शारिरिक आरोग्य निरोगी करण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी आमची कार्यशाळा आपणास मदत करु शकते हे ही आपल्या लक्षात आले असेल. त्यासाठी संमोहन उपचारांच्या आमच्या कार्यशाळेसंबंधीत माहिती कृपया जाणून घ्या.
आमची संमोहन उपचारांची कार्यशाळा एक दिवसाची असते. कार्यशाळा सकाळी ७.४५ वाजता सुरू होते व सायंकाळी ५.०० च्या दरम्यान संपते. कार्यशाळा शक्यतो रविवारीच असते.

      कार्यशाळेची फी रु. १५,०००/- (रू. पंधरा हजार मात्र) आहे. कार्यशाळेच्या आदल्या दिवशी नावनोंदणी करतेवेळी (सकाळी ९.३० ते सायं. ५.०० वा.) कार्यशाळेची संपूर्ण फी रोख स्वरूपात ( Cash) भरावी लागते.

     नावनोंदणीच्या वेळी आपणास डॉ. धनसिंग चौधरी लिखित ‘संमोहन उपचार-एक वरदान’  हे पुस्तक व V.C.D. मिळते. नावनोंदणी झाल्यावर डॉ. धनसिंग चौधरींना आपणास भेटता येईल, त्या वेळी ते आपल्या समस्यांबाबत जाणून घेतील.

     बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींनी नावनोंदणी झाल्यावर आपली रात्रीसाठी राहण्याची व्यवस्था स्वतःच करावयाची असते.

कार्यशाळेची उद्दिष्ट्ये :

१)    विद्यार्थ्यांसाठी : चुकीची मैत्री, चुकीच्या सवयी घालवून एकाग्रता, स्मरणशक्ती व परीक्षेबाबतचा आत्मविश्वास वाढवणं, त्यासोबतच सर्वांगीण व्यक्तिमत्त्वविकास साधणं; तसंच अभ्यासात अडथळे ठरणा-या विविध मानसिक - शारीरिक समस्या (ज्या विविध उपचारांनी, औषध गोळ्यांनी ब-या होत नाहीत) दूर करणं.

२)    नोकरी, व्यवसाय, राजकारण, गृहिणी, मार्केटिंग, कला- क्रीडा- वक्तृत्त्व,... यांसारख्या क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी, त्यांचं मानसिक व शारीरिक आरोग्य निरोगी करण्यास; तसंच निरोगी ठेवण्यास मदत करणं. त्यासाठी भीती, काळजी, चिंता, टेन्शन, दडपण, धडधड, निराशा, उदासिनता, निद्रानाश;... तसंच डोकेदुखी, रक्तदाब, मधुमेह, अपचन, चक्कर येणं, वैवाहिक समस्या,... असे मानसिक व शारीरिक आजार दूर करणं.

३)    विडी, पान, सिगारेट, तंबाखू, अफू, चरस, गांजा, दारू, अंमली पदार्थ,... यांसारख्या व्यसनांपासून मुक्त करणं.

कार्यशाळेचे एकूण तीन भाग असतात.

      कार्यशाळेच्या पहिल्या भागात सुरवातीचा एक तास कार्यशाळेत भाग घेतलेल्या व्यक्तीचे सोबत आलेले पालक/ नातेवाईकसुद्धा बसू शकतात. त्या वेळी कार्यशाळेचं सविस्तर स्वरूप स्पष्ट केलं जातं. म्हणजेच दिवसभर नेमकं कार्यशाळेत काय घडणार आहे, याची सर्वांनाच कल्पना दिली जाते. नंतर पालक/ नातेवाईक हॉलमधून बाहेर पडतात व कार्यशाळेत भाग घेतलेल्या व्यक्तींना आमच्यातर्फे चहा- नाश्ता दिला जातो.
चहा- नाश्ता आटोपल्यावर कार्यशाळेमध्ये खालील मुद्दे प्रात्यक्षिकासह स्पष्ट केले जातात.

१)  आपणास या समस्या का निर्माण झाल्यात ?
२)  इतर विविध विज्ञानमान्य उपचार पद्धतींचेसुद्धा आपणास अपेक्षित फायदे का झाले नाहीत ?
३)  संमोहन उपचारांच्या वेळी डॉ. चौधरी फक्त बोलतात. त्यांच्या बोलण्यात असं नेमकं काय असतं की, ज्यामुळे आपणास अपेक्षित फायदे होतात ?

हे सर्व प्रात्यक्षिकासह समजून घेतल्यावर आपल्या लक्षात येतं की, आपल्या बहुतेक समस्यांची मुळं आपल्या अंतर्मनातच आहेत व त्यातून बाहेर पडण्यासाठी डॉ. चौधरींच्या सूचना आपल्या अंतर्मनात पोचणं गरजेचं आहे.

कार्यशाळेचा पहिला भाग आटोपल्यावर कार्यशाळेत भाग घेतलेल्या व्यक्तींना आमच्यातर्फे जेवण दिलं जातं.

      कार्यशाळेच्या दुस-या भागात डॉ. चौधरी कार्यशाळेत भाग घेतलेल्या व्यक्तींच्या अंतर्मनात सूचना पोचवितात. त्या वेळी कार्यशाळेत भाग घेतलेल्या मुलींचे / महिलांचे महिला नातेवाईक सोबत असल्यास ते उपचारांच्या हॉलमध्ये एका बाजूला बसू शकतात. त्यांच्या सोबत लहान मुलं नसावीत.

      कार्यशाळेच्या दुस-या भागानंतर सर्वांना आमच्यातर्फे चहा दिला जातो.

      कार्यशाळेच्या तिस-या भागात सोबत असलेले पालक/ नातेवाईकदेखील बसू शकतात. या भागाच्या सुरवातीलाच सर्वांना खात्री पटवून दिली जाते की, कार्यशाळेच्या दुस-या भागात डॉ. चौधरींच्या सर्व सूचना कार्यशाळेत भाग घेतलेल्या व्यक्तीच्या अंतर्मनात पोचल्यात. नंतर कार्यशाळेत भाग घेतलेल्या व्यक्तींना प्रत्येकी एक छोटी मार्गदर्शन पुस्तिका व डॉ.चौधरींच्या आवाजातली एक ऑडिओ सी.डी. दिली जाते. ही  सी.डी. घरी कशी ऐकावी व स्वयंसूचना कशा घ्याव्यात, हे सर्व दररोज कोणत्या वेळी व किती दिवस करावं, याबाबत मार्गदर्शन पुस्तिकेत सविस्तर माहिती असते. हे सर्व घरी नियमितपणे करणं किती गरजेचं असतं, हे डॉ. चौधरी विविध वैज्ञानिक दाखले देत पटवून देतात. सोबत आलेल्या पालक/ नातेवाईकांनीही हे समजून घेतल्यावर, कार्यशाळेत भाग घेतलेली व्यक्ती घरी हे सगळं (स्वयंसूचना घेणं, ऑडिओ  सी.डी. ऐकणं) व्यवस्थितपणे करत आहे की नाही यावर त्यांना लक्ष ठेवता येतं, गरज पडल्यास समजावून सांगता येतं. म्हणजेच कार्यशाळेत भाग घेतलेल्या व्यक्तीला कार्यशाळेचा अपेक्षित लाभ होण्यास मदत होते.
कार्यशाळेत विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, विविध मानसिक व शारीरिक समस्यांनी त्रस्त व्यक्ती, तर काही विविध व्यसनांच्या आहारी गेलेले..... अशांचा समावेश असतो. सर्वांच्या समस्या वेगवेगळ्या, कार्यशाळा मात्र एकच ! फायदे सर्वांना वेगवेगळे (अपेक्षित) !! याचं सविस्तर स्पष्टीकरण डॉ. चौधरी कार्यशाळेच्या तिस-या भागात देतात; तसंच कार्यशाळेचे फायदे कायमस्वरूपी टिकून राहतील याची खात्रीही करून देतात.

     रँक होल्डर विद्यार्थी, उच्च पदावरील अधिकारी, राजकारणी, मोठमोठे व्यावसायिक यासारख्या व्यक्ती, ज्यांना कार्यशाळेसाठी दिवसभर वेळ देता येणे शक्य नाही, अश्यांसाठी वैयक्तिक उपचार (Personal Sitting) ची सोय उपलब्ध आहे.

     कोचिंग क्लासेस, संस्था, इन्स्टिट्यूट, ऑर्गनायझेशन, नेटवर्क मार्केटिंग कंपनी, असोसिएशन, बँक, क्लब, मित्र मंडळ, ग्रुप,... यांना ‘कामयाबी की ओर’ हा स्टेज शो, व्याख्यान किंवा संमोहन उपचार कार्यशाळा (सहभागी होणा-या व्यक्तींच्या संख्येनुसार) सवलतीच्या दरात दिल्या जातात.

टिप : इतर कोणत्याही उपचार पद्धतीस आमचा विरोध नाही. इतर उपचार सुरु असतानादेखील फायदे लवकर होण्यासाठी एक पूरक उपचार पद्धती म्हणून आमच्या संमोहन उपचारांची कार्यशाळा आपणास लाभदायी ठरू शकते.