डॉ. धनसिंग अमृत चौधरींविषयी


हिप्नोथेरपीस्ट व नॅचरोपॅथीस्ट

कृपया आधी Home Page वरील DVD बघा आणि नंतरच पुढील माहिती वाचा.

मित्रहो, आपण विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, राजकारणी, मार्केटींग क्षेत्रातील व्यक्ती ... वा कुणीही असा ! आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी व प्रगतीचं अपेक्षित शिखर गाठण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मानसिक आरोग्याने तुम्हाला साथ दिली पाहीजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं शारीरिक आरोग्यही निरोगी असायला हवं. कधी-कधी खूप काही करण्याची इच्छा असते मनाची. उत्साह असतो, तुम्ही सकारात्मक असता, आत्मविश्वास ओसंडून वाहत असतो, ...  मात्र शरीर साथ देत नाही. कधी हे दुखतं तर कधी ते दुखतं. कधी हा त्रास तर कधी तो त्रास. असं असेल तर ह्या चांगल्या मानसिकतेचा अपेक्षित फायदा करुन घेता येत नाही. काहीदा शरीर अगदी ठणठणीत, सशक्त आणि निरोगी असतं. पण मनाला मात्र उभारी नसते. कायम मरगळल्यासारखं वाटतं, कंटाळा येतो,आळस काहीच करु देत नाही. नकारात्मक विचारांनी आपल्याला घेरलेल असतं, न्यूनगंड पुढे जाऊ  देत नाही. असं असेल तर या निरोगी, सशक्त शरीराचा काय उपयोग ? तर मित्रहो, आपल्या क्षेत्रात योग्य पद्धतीने कार्यरत राहून प्रगतीचं अपेक्षित शिखर गाठण्यासाठी आपलं मन आणि शरीर निरोगी करणं व निरोगी ठेवणं यासाठी आपल्या अंतर्मनाचा किती महत्वाचा वाटा असतो, हे DVD पाहील्यावर, आता आपल्या लक्षात आलं असेलच. आणि आपल्या अंतर्मनाच्या या प्रचंड महाशक्तीचा वापर करुन घेण्यासाठी संमोहन कशी मदत करतं, हेही आपल्या लक्षात आलं असेल. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या अंतर्मनाच्या महाशक्तीचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करुन घेण्यासाठी डॉ. धनसिंग चौधरी हे योग्य मार्गदर्शक आहेत हे DVD व्दारे स्पष्ट होतंच !

आजपर्यंत हजारो गरजूंनी डॉ. धनसिंग चौधरींच्या कार्यशाळेचा लाभ घेतला, ते व्याधीमुक्त झालेत आणि आपल्या अंतर्मनाच्या महाशक्तीचा वापर करुन घेत त्यांनी प्रगतीची शिखरं गाठलीत.

डॉ. धनसिंग चौधरींच्या या संमोहन उपचारांमध्ये औषध-गोळ्या, इंजेक्शन, शस्त्रक्रिया, ...  असं काहीही नाही. त्यामुळे हि एक सुरक्षित उपचार पद्धती आहे.

डॉ. धनसिंग चौधरी लिखित ‘संमोहन उपचार-एक वरदान‘ या पुस्तकाच्या तसेच ‘संमोहन उपचार-एक वरदान‘ या VCD च्या आजपर्यंत हजारो प्रती लोकांपर्यंत पोहोचल्यात.